अथांग सागर

बंद डोळ्यातील पापण्यांचे

अपूर्ण स्वप्न तू

फेसाळलेल्या लाटांचा

मधुर संगीतकार तू

मावळतीच्या सांजेचा

अदभूत चित्रकार तू

हृदयातली स्पंदनांचा

लयीबद्ध ताल तू

अविरत मनःशांतीचा

अवखळ झरा तू

निळयाभोर आसमंताचं

ज्वलंत प्रतिबिंब तू

ओल्या मऊ स्पर्शाचा

अव्यक्त हर्ष तू

चांदण्या पांघरून निजलेला

अथांग सागर तू

खळखळणाऱ्या किनाऱ्याचा

निखळ आनंद तू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *