खडाजंगी

खडाजंगी 

आज वाजवले ऑफिसमध्ये बॉस चे बारा 

उष्ट्या भांड्यांकडे केला घरी बायकोने इशारा 

तापलेलया डोक्यावर झाला भांड्यांचा मारा 

रागा रागात केली थोडी आदळआपट 

ती गेल्यावर घेतली भांड्यांची खबर

तांब्याला घातलं ताटाच्या डोक्यावर

खुलली खळी तांब्याच्या गालावर

लाटण घातलं टोपाच्या बुडवर

बूड बिचाऱ्याच्या टाकलं चेपून

चमच्यांनी तर केला अति काहूर

सगळ्यांना टाकलं साबणाच्या पाण्यात बुडवून

छोट्या छोट्या ताटल्या अधून मधुन नाचल्या

पाळीनी दिली त्यांना एकाच लात ठेऊन

ग्लासात ग्लास मेला बसला अडकून

चेंडू सारखा दिला बेसिन मध्ये फेकुन

कालथ्याकडून घेतली वाट्यांची खबर

कॅरमच्या सोंगट्यान सारखी झाली त्यांची पळापळ

जेवणाचे डबे कोपऱ्यात बसले

झाकण उघडता नाकच बंद झाले

भांड्यांच्या आवाजांनी शेजारी खडबडून जागे झाले

भिरकावला एक दगड मोकाट बोका समजून

मग मी ही बसलो खिडकी आड लपून

उगाच ओरडलो जोरात म्याव म्याव करून

नसता ताप भांड्यांचा … कसाबसा उरकला

सगळ्यांचा राग आज भांड्यांवर काढला

बिचारी भांडी विचारान त्रस्त होती

आज कोणत्या पापाची ही शिक्षा होती 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *