भान

भान 

सुन्न मनाच्या कोपऱ्यामध्ये 

सांगेल का कुणी दडलंय काय ?

जगण्याचा मतितार्थ मला 

कुणी समजवेल काय ?

वेदनांनचा आर्त रुतला 

कुणी उकरून काढील काय?

लहरी लाटांचा खेळ असा का 

कुणी सागराला सांगेल काय ?

आमवस्येच्या शापातून चंद्राला  कुणी सोडवेल काय?

कला हसण्याची…क्षणभंगुर फुलाची 

कुणी सुकण्यापासून थांबवेल काय ?

हे असे का ? प्रश्न माझे … उत्तर 

कुणी देईल काय ?

खडतर प्रवास हा जगण्याचा 

का मरण सोपे आहे काय ?

अंतरात्मा शोधात आहे 

माझी मी मला भेटेल काय ?

भान ना मज .. जगण्या मारण्याचे 

जगण्याशी ओळख माझी इथे कुणी करून देईल काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *