माझं शहर

एके काळी शांत असणार माझं शहर, 

आता फार गजबजून गेलंय माणसांच्या गर्दी मध्ये, 

माणूसपण हरवून गेलाय 

रात्रीच आकाश चांदण्यांनी भरून जायचं,

रोषणाईच्या झगमगाटात माझं शहर बुडून गेलाय 
जिव्हाळ्याची नाती होती, 

परकी असली तरी आपलीशी होती 

शेजाऱ्या पाजार्यांची चहलपहल असायची, 

सणासुदीला देवाणघेवाणीची रेलचेल असायची 

पोरंबाळं सांभाळायला घरची दारची सगळी होती, 

सुखदुःखात सामील होणारी सगळीच जवळची होती 

पाऊस प्रेमाचा जिथे तिथे पडत होता 

गरीब असला तरी माणूस मनानं मोठा होता 
मन संकुचित झाली, ना उरला जिव्हाळा 

शेजारी कोण राही ते ही कळेना ?

माणसाला काय माणसांची गरज लागेना ?

निसर्गाचा ऱ्हास करून, सिमेंटची जंगल मावेना ?

आईबाबा वृद्धाश्रमात, मुलं पाळणाघरात भरती झाली 

बॅनर छापून नेते मंडळी सणवाराला झळकू लागली   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *