सखी


सखी
कसं सांगू सये तुला, असं खचायचं नसतं
कधी हातात तलवार घेऊन लढायचं…
तर कधी शब्दाच्या बाणांनी घायाळ करायचं…  
कधी प्रेमानी आंजारून गोंजारून बघायचं…  
नसेल समजत सरळ भाषा…तर चौदावा रत्न दाखवायचं….
 
साम, दाम, दंड सगळच तू वापरून बघ….
नाहीच जमलं तर… मला एक हाक मारून बघ…  
मी इथेच आहे तुझ्यात सामावलेली तुझी सखी…  
तू कधी मला पुकारलच नाही,
तुझ्यातली मी तुला कधी दिसलीच नाही  
सहनशक्ती तुझ्यात ठासून भरली होती
अन्यायाला वाचा तू फोडू शकत होती

बघ ना एकदा बंड करून
तू राणी हो झाशीची, जिजामाता हो शिवबाची
सिंधूताई हो अनाथांची, तेरेसा हो वात्सल्याची,  
तू सशक्त हो, तू समर्थ हो, काली तू, दुर्गा तू
लढण्यास तू सुसज्ज हो …  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *